पाचोरा – नंदू शेलकर | शहरातील संघवी काॅलनी भागात दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ बालसंस्कार व आध्यात्मिक केंद्रात १ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत श्री. दत्तजयंती सप्ताहाची विधीवत गुरुचरित्र वाचन, पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.
या भक्तीमय सोहळ्यात शहरासह ग्रामीण भागातील ५०५ महिला व पुरूष सेवेकरी गुरूचरिञ पारायणास सहभाग नोंदवित संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
संपुर्ण महाराष्ट्रात श्री. स्वामी समर्थांच्या सेवा मार्गात असंख्य सेवेकरी असल्याचे दिसुन येते. या सेवामार्गातील श्री. दत्तजयंती सप्ताहाला अनन्य साधारण महत्व आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शहरातील संघवी काॅलनी स्थित सेवा केंद्रात श्री. दत्तजयंती सप्ताहाची सुरुवात भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
ग्रामदेवता निमंञण, अग्नीस्थापना, मंडल स्थापना, प्रहर सेवा, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार या सोबतच पारायणास बसलेल्या सेवेकर्यांना संकल्प घेउन सामुहिक पारायण वाचण करण्यात आले. यामध्ये गणेशयाग, स्वामीयाग, गिताईयाग, चंडीयाग, रूद्रयाग, बलिपुर्णाहुती, दत्तजन्म उत्सव, सत्यदत्त पुजन व महाआरती अशा आध्यात्मिक विधी घेण्यात आले. यावर्षी श्री. दत्तजयंती सप्ताहात विशेष म्हणजे शहरासह ग्रामीण भागातील ५०५ सेवेकर्यांनी गुरूचरिञ पारायणास सहभाग नोंदविला.
तसेच अनेक सेवेकरी यांनी आपल्या घरीही ही सेवा केली. या सप्ताह काळात दिवसा स्ञिया व राञी पुरूष सेवेकरी प्रहराची सेवा दिली. यासोबतच सप्ताहात शहरासह तालुक्यातील हजारो सेवेकरी आपली सेवा श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रूजु करुन दर्शनाचा लाभ घेतला.
या सप्ताहासाठी सेवा केंद्रातील याज्ञिकी विभाग, आरती विभाग, मार्गदर्शन विभाग, नियोजन विभाग, नैव्यद्य विभाग, प्रश्नोत्तर विभाग यासारख्या विभागांचे सेवेकरी केंद्र प्रतिनिधी गोकुळ पाटील, राम जळतकर, संजय पाटील, सुभाष पाटील, नरेश गर्गे, डी. पी. वाणी, बी. जे. पाटील, भरत गायकवाड, पी. के. सिनकर, सुवर्णसिंग राजपुत, गणेश वाणी, संदिप पाटील, नंदा मिस्तरी, हर्षल चित्ते, गजेंद्र चौधरी, राहुल बावचे, संकेत बोरसे, रेखा पाटील, शंभु पाटील, बी. एस. पाटील, जगन्नाथ सोनवणे, गणेश कापुरे, सार्थक वाणी, योगेश पाटील, जितेंद्र देवरे, चेतन पवार यांचेसह अन्य सेवेकरी यांनी अहोराञ परिश्रम घेतले. या सप्ताहात पाचोरा येथील श्री. स्वामी समर्थ बालसंस्कार व अध्यात्मिक सेवा केंद्रातील वातावरण श्री. स्वामी समर्थ नामकरणाने मंत्रमुग्ध झाले होते.