जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या गोदावरी इंजिनिअरींग कॉलेज समोरील दुकानाजवळून विद्यार्थ्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ६ डिसेंबर रेाजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, अजय अनिल पाटील(वय-२५) रा. पळासखेडे ता. अमळनेर हा तरूण जळगाव शहरातील नंदाई महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोदावरी इंजिनिअरींग कॉलेज समोरील नास्त्याच्या दुकानाजवळ दुचाकी (एमएच १९ बीएफ २६३४) ने आला होता. दुकानाच्या बाजूला दुचाकी पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.