Home क्राईम कारण नसतांना तरूणाला दोघांकडून मारहाण

कारण नसतांना तरूणाला दोघांकडून मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोलाणे गावातील धक्का चौकात काहीही कारण नसतांना तरूणाला शिवीगाळ करून लोखंडी पट्टीने डोक्यावर आणि हातावर मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे नामदेव गोकुळ कोळी (वय-२०) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतातील कामे करून आपला उदरनिर्वाह करतो. २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातील धक्का चौकात नामदेव कोळी हा गप्पा मारत असतांना काहीही कारण नसतांना गावातील अरूण शांताराम कोळी आणि विलास रामदास कोळी यांनी शिवीगाळ करून लोखंडी वस्तू डोक्यात व हातावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. तसेच तुला पाहून घेईन असा दम दिला. हा प्रकार घडल्यानंतर नामदेव कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अरूण शांताराम कोळी, विलास रामदास काळी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound