Home Cities अमळनेर प्रताप तत्वज्ञान केंद्राची कवयित्री बहिणाबाईंची पुण्यतिथी साजरी

प्रताप तत्वज्ञान केंद्राची कवयित्री बहिणाबाईंची पुण्यतिथी साजरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी प्रताप तत्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अमळनेर येथे आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांनी प्रताप तत्वज्ञान केंद्रास भेट दिली. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या वाटचालीची माहिती देण्यात आली. त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर साळेगावकर, मसापचे कार्यवाह वि.दा.पिंगळे, मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, नरेंद्र निकुंभ, डॉ.अमोघ जोशी, प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार, सल्लागार समिती सदस्य प्रा.धर्मसिंह पाटील, दिनेश नाईक, मनोहर सोनवणे, पंडीत नाईक, गिरीश चौधरी, गोपाल महाजन आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी तत्वज्ञान केंद्रातील ग्रंथालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound