जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब जळगाव इलाईट, गोल्डसिटी हॉस्पीटल व मातोश्री जमनाबाई पलोड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पिंप्राळा रोडवरील गोल्डसिटी हॉस्पीटल येथे 3 व 4 डिसेंबर रोजी विनामुल्य प्लास्टीक, कॉस्मेटिक व हॅण्ड सर्जरी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.पंकज जिंदल (पुणे) व डॉ.शंकर सुब्रमण्यम (मुंबई) हे रुग्णांची तपासणी, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया करणार आहेत. जळलेले व्यंग, भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्मतः असलेले हाताचे, पायाचे व शरीरावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, मस व चेहऱ्यावरील वाकडे व्रण, मुरुमांमुळे झालेले खड्डे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू, वाकडे नाक व कान, हनुवटीच्या आकारात बदल, गरज नसलेले मोठे किंवा विचित्र व्रण, अपघाताने आलेल्या विकृती व व्यंग आदी समस्या असलेल्या व्यक्तींवर या शिबिरात विनामूल्य उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. स्त्री रुग्ण व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ही आयोजकांनी कळविले आहे.
या विनामूल्य सर्जरी शिबीराचा फायदा घ्यावा असे आवाहन अध्यक्ष डॉ. पंकज शाह व मानद सचिव निलेश झंवर यांनी पत्रकान्वये केले आहे.