दिक्षीतवाडीतील महावितरण कार्यालयावर महिलांचा मोर्चा (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगर, गोपाळपुरा आणि जुने जळगाव परिसरातील वीज ग्राहकांना वीज बिलासाठी महावितरणच वसुली पथकाकडून चुकीची वागणूक दिली जात आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी २ डिसेंबर दुपारी दिक्षीतवाडी येथील महावितरण कार्यालयावर स्थानिक नागरीकांनी मोर्चा काढून जाब विचारला आणि वाढीव विज बिले कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगर, गोपाळपुरा आणि जुने जळगाव परिसरात स्थानिक रहिवाशांना महावितरणकडून चुकीची वागणूक दिली जात आहे. यामध्ये वसुली पथक ग्राहकांच्या घरी येऊन चुकीच्या पद्धतीने घरात घुसून सामानांची फेकाफेक करत वसुलीचे काम करत आहे. त्याचप्रमाणे पूर्वकल्पना न देता मीटरमध्ये काहीही दोष नसतांना घरातील मीटर काढून घेऊन जाणे, याची कोणत्याप्रकारचा पंचनामा जागेवरच न करता, ग्राहकांला दोषी ठरविण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील वातावरण खराब झाल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज बिल वसुली पथकाला योग्य समज देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणीसाठी शुक्रवारी २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक रहिवाश्यांनी दीक्षितवाडी येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर काशीराम बारी, नथू बारी, सुरेश बारी, देविदास बारी, लक्ष्मण मराठे, अरुण बारी, शिवलाल बारी, ईश्वर कोळी, संतोष पाटील, कमलबाई अत्तरदे, नारायण अत्तरदे, वैशाली पाटील, कीर्ती बारी, कल्पना कोळी, पूजा बारी, भालचंद्र खडके यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content