Home क्राईम शेतातून ठिंबक नळ्यांची चोरी

शेतातून ठिंबक नळ्यांची चोरी

0
33


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वाघळे शिवारातील शेतातून शेतकऱ्याच्या मालकीच्या ९३ हजार रुपये किमतीच्या ठिबक नद्यांची चोरी चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश जगन्नाथ वाणी (वय-४२) रा. गणपती चौक, वाघळी, चाळीसगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाघळी शिवारातील चामर्डीरोडवर शेत आहे. या शेतात त्यांनी कापसासाठी ठिंबक ठेवण्यात आलेल्या होत्या. ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मालकीच्या ठिंबक नळ्या असा एकूण ९३ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवार १ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. दरम्यान याप्रकरणी शेतकरी निलेश वाणी यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जयंत सपकाळे हे तपास करीत आहे.

 

 

 


Protected Content

Play sound