पहूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे “जीवन कौशल्य” विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

 

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत जीवन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मनुष्य हा भावनाप्रधान प्राणी असून प्रभावी संप्रेषणासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भाव -भावना समजून घेतल्या पाहिजेत , असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील प्रयोगशील शिक्षक शंकर भामेरे यांनी केले.

पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत जीवन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते .

प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या निर्देशांन्वये शेरी आणि लोंढरी जिल्हा परिषद शाळांच्या वतीने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले.

परिषदेचे अध्यक्षस्थान आर . टी . लेले हायस्कूलचे मुख्याध्यापक आर .बी . पाटील यांनी भुषविले .प्रास्ताविक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. केंद्रप्रमुख भानुदास तायडे यांनी NAS 2021विश्लेषणात्मक चर्चा करून जळगाव जिल्ह्याची सद्यस्थिती याविषयी मार्गदर्शन करून प्रशासकीय परिपत्रकांचे वाचन केले.

ज्ञानेश्वर चौधरी यांनी निपुण चाचणी क्रमांक दोन विषय निहाय चर्चा करून उपचारात्मक अध्यापनाविषयी मार्गदर्शन केले. अकबर शेख यांनी प्रिंट काढणे व पेज सेटअप याविषयी मार्गदर्शन केले. किशोर काळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी पहूर केंद्रातील शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Protected Content