पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. प्रकृती खालवल्याने गेली पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते.
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.