Home Cities यावल यावल महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा

यावल महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा

0
43

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाव्दारे संचलीत, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातुन चालविल्या जात असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने आज दि. २५ देशाचे माजी गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावल येथील महाविद्यालयाच्या परिसरात आयोजीत या कार्यकमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य व केंद्र संयोजक प्रा. ए. पी. पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. मुकेश येवले, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. थिघडे, केंद्र सहाय्यक संतोष ठाकूर, प्रा. मनोज पाटील, प्रमोद भोईटे, मिलिंद बोरघडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.


Protected Content

Play sound