जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे अतिरिक्त अधिष्ठाता कार्यभार देण्यात आला आहे. असे आदेश बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा काढण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदलीची चर्चा सुरू होती. डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोवीड काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपडे त्यांच्याच कार्यकाळात झाले आहे. यापुर्वी देखील त्यांची डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली करण्यात आली होती. परंतू त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पुन्हा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्त केले गेले. दरम्यान, बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरात डॉ. जयप्रकाश रामानंद यांची धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी अतिरिक्त अधिष्ठाता म्हणून लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश राज्याचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढले आहे.