छात्र सैनिकांच्या सायकल मोहिमेचा महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधी |  राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक दि. २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान  मेगा सायकलिंग मोहिमेत सहभाग घेत आहेत. या मोहिमेस महापौर जयश्री महाजन यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.

 

राष्ट्रीय छात्र सेनेचे स्थापना आणि आझादी का अमृत महोत्सवाच्या ७५ यांचे औचित्य साधून  १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन जळगाव येथे ग्रुप मुख्यालय, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली महापरिक्रमा  मेगा सायकलिंग मोहीम राबवत आहे. यात छात्र सैनिक सुमारे २२०० किलोमीटरचे अंतर पार करतील. यात विशेष म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असलेली बाब म्हणजे चुकीची माहिती समाजात पसरवण्यापासून रोखण्यासाठी  छात्रसैनिक या मोहिमेत प्रत्येक शहरात, महाविद्यालयात, शाळांमध्ये या विषयावर पथनाट्य सदर करून जनजागृती देखील करणार आहेत. अमरावती ग्रुपचे प्रमुख ब्रि. शंतनू मयंकर या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रक म्हणून असतील. ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल सी. पी. भाडोला या मोहिमेचे अधिकृत नेतृत्व करतील तर १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगावचे लेफ्ट. प्रशाकीय  अधिकारी कर्नल पवन कुमार हे देखील मोहिमेत विशेष आयोजक म्हणून योगदान देत आहेत. या मोहीमचा जळगाव येथून महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. ही मोहीम  अमरावती, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर येथून  पुणे येथे सांगता होणार आहे. या  सायाकालीद्वारे महाराष्ट्रातील एन.सी.सी.च्या सर्व विभागीय कार्यालयांना भेट देऊन महाराष्ट्र परिक्रमा करणार आहेत.

या मोहिमेत मूळजी जेठा महाविद्यालयाचे ४,  एन.एम. कॉलेज चे ३, बाहेती कॉलेजे चे २ तर अकोला येथील १  छात्र सैनिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर या मोहिमेत एन.सी.सी अधिकारी कॅप्टन (डॉ.) योगेश बोरसे, लेफ्ट. गौतम भालेराव, लेफ्ट. शिवराज पाटील यात मोहिमेत योगदान देणार आहेत. तसेच बटालिअन चे बी.एच.एम. तात्या काकलीज हे सोबत असणार आहेत. मोहिमेसाठी १८ महाराष्ट्र बटालिअनचे बॅक अप वाहन कॅंटर असणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content