जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेतली विद्यार्थीनी प्रांजल विलास सोनवणे ही 96 टक्के मार्क मिळवून जळगाव जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळाला आहे.
तिच्या यशात तिचे आई, वडील, प्राध्यापक वर्ग आणि मित्रमंडळी यांचा सहभाग असल्याचे ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’शी बोलतांना सांगितले. प्रांजल ही महापालिकेच्या प्रभाग समिती 1 चे प्रभाग अधिकारी व्ही ओ सोनवणी यांची द्वितीय कन्या आहे. तिच्या यशाबद्दल मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापकांनी कौतूक केले आहे.