गिरणा धरणातून शेतकऱ्यांना ४ आवर्तन सोडण्यात येणार (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात गिरणा धरणावर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याचे ४ आवर्तन सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठीच्या नियोजनाबाबत शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता बैठक घेण्यात आली.

 

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, गिरणानदीवर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजून पाणी मुबलक प्रमाणावर असल्यास चौथे आवर्तन देखील सोडण्यात येणार आहे. १९८० सालानंतर पहिल्यांदा चार आवर्तने सोडली जाणार आहे. पिक विमाची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकांना येत्या १० दिवसात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम अदा करावी नाहीतर व्याजासकट रक्कम द्यावे लागेल अश्या सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.  जळगाव जिल्ह्यात हवामानाचे ८६ केंद्र आहेत. आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत गाव तिथे हवामान केंद्र बसविण्याचा निर्णयाला मंजूरीसाठी साकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास अर्ध्या गावांमध्ये हवामान केंद्र बसविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे मुलांनी ॲग्रोवर्ल्डमध्ये सहभाग घेतला होता अशा मुलांना बँकेकडून प्रोत्साहन म्हणून सत्कार करण्यात आला.  जिल्ह्यात केळीच्या ऑर्गनाइझेशसाठी पुण्याची टिम जळगाव जिल्ह्यात दाखल झाली होती. यातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

Protected Content