बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातून रोकड, सोन्याचे दागिने आणि कपडे असा एकुण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पुंडलिक मिस्तरी (वय-७५) रा. जामदा ता.चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ नोव्हेंबर रात्री १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून त्यांच्या घरातील गोदरेज कपाटातून नऊवारी साड्या, रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. रामदास मिस्त्री हे घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. त्यांनी लागलीच रात्री ११ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील करीत आहे.

Protected Content