चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रूखणखेडा शिवारातील शेतातून ५० हजार रूपये किंमतीचे बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील रूखणखेडा शिवारातील शेतात मनोहर नरहर अडावदकर (वय-५५) याचे मालकीचे ५० हजार रूपये किंमतीचे दोन बैल मोकळ्या जागेत बांधलेले होते. शनिवार १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातून दोघा बैलांची चोरी केल्याचे समोर आले. शेतकरी मनोहर अडावदकर यांनी त्यांच्या बैलांचा शोध सर्वत्र घेतला. परंतू त्यांना कुठे त्यांची बैलजोडी आढळून आली नाही. अखेर रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील ताास पोलीस नाईक किरण शिरसाठ करीत आहे.