बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मुजोरी मलकापूर रोडवरील अमर हॉटेल जवळ चौकामध्ये तसेच आंबेडकर पुतळा चौकामध्ये अतिक्रमण करून दुकाने लावून तसेच दुकानासमोर अस्त व्यस्त वाहने उभे करून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पदचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. एखाद्या नागरिकाने अतिक्रमण धारक किंवा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला सांगितले की, वाहन बाजूला करा तर ते उद्धटपणे नागरिकांच्या अंगावर धावून जातात, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
बोदवड शहरांमधील अमर हॉटेल जवळ अतिक्रमण हात गाड्यांचे तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहने भरपूर प्रमाणात उभे असतात. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहनांना तसेच मोठ्या वाहनांना मलकापूर कडे जाताना व येताना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना सुध्दा अमर हॉटेल जवळील चौकातून व आंबेडकर पुतळा चौकातून आपला जीव मुठीत घेऊन चालावा लागतो. तसेच हा रस्ता नेहमी वर्दळीचा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरील अतिक्रमण व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना शिस्त लावावी. जेणेकरून बोदवड शहराची शांतता भंग होणार नाही, तरी या संदर्भात पोलीस प्रशासन व नगरपंचायत विभागाने कारवाई केली नाही तर बोदवड शहरामध्ये अनुचित प्रकार व अपघात घडू शकतात. त्यामुळे शहराची शांतता भंग होऊ शकते त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी नागरिकांमधून बोलल्या जात आहे.