जेवणाच्या बिलवरून राडा ; एक जखमी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथील हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून मारहाण झाल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या मारामारीत एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज जखमी इसमाच्या वडिलांनी पाचोरा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पवनकुमार भागवत सुर्यवंशी (धोबी) व प्रमोद दिलीप पाटील रा. सामनेर ता. पाचोरा हे ५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सामनेर गावानजिक असलेल्या एका हाॅटेल मध्ये गेले. जेवण झाल्यानंतर हाॅटेल चालक, पवनकुमार सुर्यवंशी व प्रमोद पाटील यांच्यात जेवणाच्या बिलावरुन शाब्दिक चकमक होवुन भांडण झाले. तद्नंतर ६ नोव्हेंबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास पवनकुमार सुर्यवंशी व प्रमोद पाटील हे जेवणाचे बिल देण्यास हाॅटेलवर गेले असता आदल्या दिवसाच्या भांडणाचा वचपा काढत पवनकुमार सुर्यवंशी व प्रमोद पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पवनकुमार याचे डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास जळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पवनकुमार यांची प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्यास मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पवनकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान १० नोव्हेंबर रोजी पवनकुमार सुर्यवंशी याचे वडिल भागवत सुर्यवंशी यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आर्यन मोरे (पुर्ण नाव माहीत नाही) रा. हनुमान नगर, पाचोरा व गोकुळ नेरपगार रा. सामनेर ता. पाचोरा, ह. मु. पाचोरा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.

Protected Content