जळगावात राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |    जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे नुकताच सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे सर्व समावेशक उपवर वधू घटस्फोटीत विधवा विदुर आदींचा निशुल्क राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

 

जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी आयोजित उपवर वधू मेळाव्यासं  प्रमुख अतिथी म्हणून चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर , आमदार तथा माजी मंत्री संजय सावकार, महापौर जयश्रीताई महाजन  आ. राजू मामा भोळे,  आ. लताताई सोनवणे, जिल्हा शिवसेनाप्रमुख सुरेखाताई तायडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकार,  सरपंच राजेश वाडेकर, सरपंच संतोष सावकारे , गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. संदीप भारुडे,  दिनेश देवरे,  अरुण गाडेकर,  विलास भोळे, गजानन लिंबोरे,  रामदास सावकार, अशोक मामा सावकार श्री. सपकाळे,  भूषण तायडे, राजेंद्र बावस्कर,  मनोज आहुजा, विजय पवार, खंडू पवार, राज्य कार्यकारणी सदस्य संजय वानखडे, विश्वनाथ सावकारे, वसंतराव नेटके, आर. आर. सावकारे, विकास संघ जिल्हाध्यक्ष अॅॅड. चेतन तायडे, उपाध्यक्ष गजानन दांडगे,  सचिव प्रा. धनराज भारुडे , ज्योतीताई निंभोरे,  बाळकृष्ण किरोडे, कुणाल तायडे वधू वर परिचय समिती अध्यक्ष केशव ठोसरे उपाध्यक्ष काशिनाथ इंगळे  सचिव अशोक भारुडे, उत्तम सोनवणे,  शैलेश पवार, मनोहर जोनवाल, पंडित पवार, भिकन जाधव आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रास्ताविक प्रा. धनराज भारुडे यांनी केले.  यानंतर उपस्थित मान्यवराच्या हस्ते व प्रथम नाव नोंदणी केलेले उपवधू उपवर यांच्या हस्ते जगद्गुरु संत रोहिदास महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चे पूजन तथा दीप प्रज्वलन करून राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवराचे स्वागत चर्मकार विकास संघाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळेस मध्य प्रदेश गुजरात तसेच राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेले ३६०  वर आणि १७५  प्रथम वधू अशा एकूण ५३५  वधू वर यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन भरले होते.

याप्रसंगी  महापौर  जयश्रीताई महाजन  आमदार राजू मामा भोळे,  आमदार संजय सावकारे,  आमदार लताताई सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना चर्मकार विकास संघाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून समाजाने संघटित होऊन सर्वाधिक प्रगती साधण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी सकाळी दहा ते बारा या वेळेत १६  ऑक्टोंबर रोजी श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या २०० वधू वरांचे परिचय पत्रकांचे प्रदर्शन तसेच दुपारी चार ते पाच या वेळेत जळगाव येथे झालेल्या ५३५  वधूवरांचे परिचय पत्रकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खामकर यांनी चर्मकार विकास संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.  सूत्रसंचालन  संजय वानखडे  व गजानन दांडगे, मीनाक्षी घोलाने यांनी तर आभार अॅड.चेतन तायडे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी अॅड. अर्जुन भारुडे, युवराज गोलाने , पुरुषोत्तम चिमणकर,  कमलाकर ठोसर, प्रा. संदीप चोकोबार,  अॅड. मुकेश कुरील,  दीपक कळसकर,  विशाल सुरडकर,  प्रा. रवींद्र नेटके, संदीप ठोसर,  कैलास शेगोकार, विजय घुले,  ज्ञानेश्वर शेगोकार, किशोर घुले,  राहुल डोळे,   सागर अहिरे,  गोपाल चव्हाण, तुषार मोरे,  मयूर अहिरे,  केशव सुरवाडे, गणू ठोसर, बाळकृष्ण खिरोडे, छगन भारुडे,  दीपक नेटके, नितीन नेरकर, अनिल तायडे, हेमंत ठोसरे, योगेश लोखंडे, मेघ शाम सावकारे,  हितेश शेकोकार,  प्रा. किसन भारुडे, नितीन तायडे, महेश कडस्कर आदींनी कामकाज पाहीले.

Protected Content