Home Cities पाचोरा एलईडी दिव्यांनी चकाकणार पाचोर्‍यातील वॉर्ड क्र. १ !

एलईडी दिव्यांनी चकाकणार पाचोर्‍यातील वॉर्ड क्र. १ !

0
31

led light pachora

पाचोरा प्रतिनिधी । येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये नगरसेवक भूषण वाघ यांच्या उपस्थितीत एलईडी लाईट लावण्याचे काम सुरू झाले आहे.

पाचोरा शहरातील वॉर्ड १ मध्ये विवेकानंद नगर थेपडे नगर रेणुका कॉलनी आशीर्वाद ड्रीमसिटी,गणेश कॉलनी,पाटील नगर हनुमान वाडी इ.परीसरात एल.ई.डी लाईट लावण्याच्या कामाचे उदघाटन नगरसेवक भूषण दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भास्कर नाना आहिरे, चंद्रकांत वाडेकर, वैभव वाडेकर, बाबा राजपूत, बापू महाजन, सागर महाजन, वनसिंग पाटील, महेश माळी यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यामुळे आता हा परिसर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound