शेंदुर्णी येथे नगरपंचायत करवाढ व प्रारूप विकास आराखडा विरोधात मोर्चा

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शेंदुर्णी नगरपंचायत व नगररचना विभाग जळगांव यांनी शहरातील सर्व सामान्य नागरीकांना विश्वासात न घेता आपला प्रारूप विकास आराखडा तयार करुन जाहीर केल्याच्या विरोधात नागरीकांनी सोमवारी सकाळी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

 

शेंदुर्णी नगरपंचायतीने शहरातील नागरीकांना विश्वासात न घेता आपला प्रारूप विकास आराखडा तयार करुन जाहीर केली तसेच सन २०२३ ते २६ करिता एकतर्फी मालमत्ता करवाढ नोटीसा शहरातील नागरिकांना बजावल्या आहेत. याच्या विरोधात सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शेंदुर्णी नगर पंचायत कार्यालयावर नागरिकांचा भव्य मोर्चा सकाळी ११ वाजता नेण्यात आला. त्यावेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पदाधिकारी नगर पंचायत कार्यालयात उपस्थीत नसल्याचे पाहून नागरिकांनी संताप व्यक्त करत नगर पंचायत कार्यालयाचे प्रवेश द्वारा समोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले.

 

नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या नगरंचायतीने मनमानी व अन्याय्य पद्धतीने केलेली कर वाढ तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचे जमिनीवर प्रारुप विकास आराखड्यात टाकलेले आरक्षण रद्द करण्यासाठी एकमुखी मागणी करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी ऑफिस वेळेत उपलब्ध होत नाही आणि प्रारूप विकास आराखडा आरक्षण विरोधात हरकत घेण्यासाठी प्रारूप आराखडाही उपलब्ध करुन देत नाही म्हणून एकमुखी निषेध व्यक्त करण्यात आला. दुपारी १२.३० वाजता मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे नगर पंचायत कार्यालयात उपस्थित झाले. शेंदुर्णी शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांची अन्याय्य कर वाढ व चुकीचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यासाठी शेंदुर्णी नगर पंचायतवर मूक मोर्चा काढण्यासंदर्भात नियोजन बैठक रविवारी ३० ऑक्टोबर रोजी संत कडोजी महाराज मंदिरात घेण्यात आली होती. बैठकीत उपस्थित नागरिकांनी नगरपंचायतीने नव्याने आकरलेले जुलमी कर तसेच प्रारूप विकास आराखडा या विषयी नाराजी व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचे ठरविले होते.

Protected Content