जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुसुंबे खुर्द ग्रामपंचायत येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदीरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदीरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्ताने पुष्पहार व प्रतिमा पुजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच यमुनाबाई हिलाल ठाकरे, ग्रामसेवक जयपाल चिंचोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, चंद्रकांत पाटील, श्रावण कोळी, रामदास कोळी, मिना पाटील, अश्विनी पाटील,बेबाबाई तडवी आदी उपस्थित होते.