



जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यालय येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल तसेच इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय एकता दिवस म्हणून राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची शपथ यावेळी सर्वांनी ग्रहण केली.
कार्यक्रम प्रसंगी देवेंद्र चौधरी , सुनील नारखेडे , सुधीर वाणी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


