मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार एकनाथराव खडसे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्यावर केलेल्या टिकेला त्यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. जो व्यक्ती आपल्या बायकोला साडी खरेदी करू शकत नाही तो मर्द नसल्याचे ते म्हणाले होते. खडसेंच्या या टिकेला आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
या संदर्भात वृत्तवाहिन्यांशी बोलतांना आमदार शहाजी पाटील म्हणाले की, माझा सांगोल्यातील गणपतराव देशमुख यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराशी सामना होता. चारदा पराभव झाल्यानंतर मी आमदार बनलो. या कालखंडात माझी आर्थिक स्थिती यथातथा होती. मात्र माझी सासुरवाडी ही सांगोल्यातील असल्याने पत्नीची आबाळ झाली नाही. मात्र खडसेंना या सर्व साबींची उठाठेव करण्याची काहीही आवश्यकता नाही. त्यांनी माझी मर्दानगी तपासून पाहू नये. आम्ही आयुष्यात वाईट मार्गाने कमाई कमावलेली नाही. याचमुळे आम्ही आज सुखाने आहोत. खडसेंनी त्यांचे काय असेल ते पहावे असा टोला देखील शहाजी पाटील यांनी मारला आहे.