Home धर्म-समाज पाचोऱ्यात २६ नोव्हेंबरला धम्म दिक्षा सोहळयाचे आयोजन

पाचोऱ्यात २६ नोव्हेंबरला धम्म दिक्षा सोहळयाचे आयोजन

0
34

पाचोरा, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील सर्वांचे परीचित असलेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत हरीश प्रेमा आदिवाल व त्यांचे चिरंजीव व बामसेफचे कार्यकर्ता दिपक हरीष आदिवाल (एम.एस ई .बी.कर्मचारी) यांच्या सह परीवारातील सदस्यांनी “धम्मदीक्षा” घेण्याचा जाहीर निर्णय घेतला असुन येत्या दि. २६ नोव्हेंबर रोजी पाचोरा शहरात हा धम्म दिक्षा सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आज दि. २८ आॅक्टोबर रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी धम्म दिक्षा सोहळा समितीचे अध्यक्ष आनंद नवगिरे, उपाध्यक्ष आर. पी. बागुल, प्रकाश बनसोडे, भाऊराव पवार, गौतम निकम, संतोष कदम, बी. आय. अहिरे, संयोजक किशोर डोंगरे, खजिनदार राजेंद्र खर्चाने, सोहळाकार्य सदस्य सुनील शिंदे, पृथ्वीराज लोंढे, अविनाश भालेराव, अशोक मोरे, अनिल लोंढे, विनोद अहिरे, आर. आर. सोनवणे, शंशिकांत मोरे, यशवंत सोनवणे, भालचंद्र ब्राह्मणे, दीपक तायडे, राजू गायकवाड उपस्थित होते.


Protected Content

Play sound