Home Uncategorized मलकापुर घरफोडीतील संशयिताला जळगावात अटक

मलकापुर घरफोडीतील संशयिताला जळगावात अटक


thief
 

जळगाव (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात घरफोडी करून ऐवज लुटणारा चोरटा जळगाव शहरातील इस्लामपुरात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिपेठ पोलिसांनी त्याला आज दुपारी सापळा रचून अटक केली. त्याला आज सायंकाळी पुढील कारवाईसाठी मलकापूर पोलीस यांच्या ताब्यात देणार आहेत.

 

मिळालेल्या माहिती नुसार, जावेद शाफिक शहा (वय 27 रा. पांढरी पालपेठ) रसीद जमादार यांच्या घराजवळ मलकापूर, बुलढाणा याच्या विरोधात बोराखेडी पोलिस स्टेशन मलकापूर येथे भाग 5, गुन्हा रजिस्टर नंबर 169/2019 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. जावेद हा जळगाव शहरातील इस्लामपुरा भागात राहत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक व्ही डी ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ महाजन, गिरीश पाटील, धनंजय येवले यांनी इस्लामपुरा भागात आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जावेद शहा याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी बोराखेडा पोलीस स्टेशन मलकापूर यांच्या ताब्यात आज सायंकाळपर्यंत देण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound