Home Cities पाचोरा पाचोऱ्यात टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाश कंदील

पाचोऱ्यात टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाश कंदील

0
46

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज सर्वत्र बाजारात प्लास्टिक पासून पर्यावरणास घातक असे आकाश कंदील सर्वत्र दिसत आहेत. परंतु पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू उदाहरणार्थ घरातील पुठ्ठा, कार्डशीट, वर्तमानपत्र, कागदी मनी घेवुन हाताने डिझाईन करून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे आकर्षक आकाश कंदील बनवून जणू प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घेतला.

या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीबदद्ल शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील. यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप दिली आहे. विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक प्रमोद एम. पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

यावेळी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व भविष्यात असाच उपक्रम सुरू ठेवावा म्हणून कलाशिक्षक प्रमोद पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound