Home क्राईम घरफोडी : बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

घरफोडी : बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील राधेश्याम कॉलनीत बंदघर फोडून सुमारे २ लाख २७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षा गोविंदा भागवानी (वय-२७) रा. राधेश्याम कॉलनी, हटकर मंदिराच्या पाठीमागे, मोहाडी रोड जळगाव या महिला पती, सासू व सासरे यांच्यासह वास्तव्याला आहेत. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. ६ ऑक्टोबर रोजी हर्षा भागवानी हे त्यांचे पतीसह मुंबईला ३ दिवसांसाठी कामानिमित्त गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर बंद केले होते. घर बंद असल्याचा संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील १४ हजार रुपयाची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान हर्ष भागवानी ह्या मुंबईहून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. घरातील सामान व लोखंडी कपाटातील वस्तू सर्व अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. या संदर्भात त्यांनी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound