जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पहिल्या पत्नीच्या औषधोपचाराठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसऱ्या पत्नीला पैशांची मागणी करत पतीसह त्याच्या सावत्र मुलांकडून छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेरवाशीन आरती कृष्णा चौधरी (रा. रोकडेवाडा असोदा) येथे वास्तव्यास आहे. आरती चौधरी यांच्या नवऱ्याची पहिली पत्नीच्या औषधोपचारासाठी पतीने कर्ज काढले होते. त्यानंतर उपचारादरम्यान पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्यांना दोन मुले. त्यात पतीने दुसरे लग्न आरती चौधरी यांच्याशी केले. दरम्यान, सवतेच्या औषधोपचारासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी पती कृष्णा पाटील हा पत्नी आरतीला पैशांची मागणी केली. पैश्यांची पुर्तता न केल्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेसह तिच्या आईला धमकी देण्यास सुरूवात केली. यासाठी तिचे सावत्र मुले देखील त्रास देवू लागले. अखेर या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. याबबात त्यांनी शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती कृष्णा बळीराम चौधरी, मुलगी रुचिता कृष्णा चौधरी व मुलगा खिलेश कृष्णा चौधरी रा. असोदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवलदार युनूस शेख हे करीत आहेत.