Home क्राईम तरूणीवर जबरी अत्याचार; नंतर केला गर्भपात !

तरूणीवर जबरी अत्याचार; नंतर केला गर्भपात !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार करून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यात उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील याची तरूणीशी २०२१ मध्ये ओळख निर्माण झाली. व मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर तरूणीला निलेशने लग्नाचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरी आणि त्यांच्या खळ्यात तरूणीवर जुन २०२२ पर्यंत वेळीवेळी वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली. ही माहिती निलेशला समजल्यानंतर त्याने तरूणीची इच्छा नसतांना गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, तरूणीने नातेवाईकांसह यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश पाटील याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound