Home राजकीय काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या : नारायण राणे

काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या : नारायण राणे


narayan rane 650x400 81462301267
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही आणि तसा काही प्रस्तावही नाही. मी एनडीएमध्येच आहे आणि राहणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिले आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज सकाळपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेला उधान आले होते. मात्र, ही सगळी चर्चा नारायण राणे यांनी फेटाळून लावली आहे. एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत आले असताना आज त्यांनी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेस प्रवेशाची चर्चा कुठून सुरू झालीय? माझी कुणासोबतही चर्चा झाली नाही. काँग्रेस प्रवेशाचा प्रश्नच नाही,’ असे राणे संतापात म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound