Home Cities अमळनेर रस्त्यावरील मोठी झुडपे हटविण्याची मागणी !

रस्त्यावरील मोठी झुडपे हटविण्याची मागणी !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर-कळमसरे या रस्त्यावर आलेल्या काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी भाजयुमोच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील तालुक्यातील कळमसरे या रस्त्यावर आलेल्या काटेरी झुडपामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गावातील नागरीकांना शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे, समोरुन येणारी वाहने या झुडपामुळे दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनेक अपघात देखील झालेले आहेत. तरी मागणीची दखल घेवून तात्काळ रस्त्यालगतची झाडे-झुडपे काढुन नागरीकांचे येणे-जाण्यासाठी रस्ता मोकळा करावा अशी विनंती तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी केली आहे. या निवेदनावर विनोद पाटील,मनोहर पाटील,राहुल पाटील,मच्छीन्द्र पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound