Home क्राईम शिरसोलीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

शिरसोलीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
35


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील इंदीरा नगरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वडील शेतीमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी मुलगी शाळेत जावून येते असे सांगून सकाळी ६ वाजता घरातून निघाली. दुपारीपर्यंत मुलगी घरी न आल्याने वडीलांसह तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. अखेर रात्री ९ वाजता मुलीच्या वडीलांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound