Home Cities अमळनेर लम्पी आजाराने बैलाचा मृत्यू; शेतकरी हवालदिल

लम्पी आजाराने बैलाचा मृत्यू; शेतकरी हवालदिल

0
197

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निम येथे लम्पी आजाराने बैलाचा मृत्यू झाल्याची घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुधन पाळणारे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

राज्यात सद्या पशु धणावर लम्पि या आजाराने डोके वर काढले होते त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिक ठिकाणी गाव पातळीवर अजूनही लसीकरण देखील केले जात आहे. आज रोजी अमळनेर तालुक्यातील शेतकरी नारायण भिवसन क्षीरसागर यांच्या मालकीचा एका बैलाचा लम्पी या आजारामुळे मृत्यू झाला. गेल्या १० ते १५ दिवसापासून हा बैल आजारी होता. या बैलास लम्पीची लक्षणे दिसून आले. त्यानंतर उपचार देखील सुरू होते, परंतु आज अखेर हा बैल दगावला.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवी गाडे तसेच कळमसरे येथील सहाय्यक बी. एस. पाटील यांनी घटनास्थळी बैलाचे शवविच्छेदन करून पंचनामा केला. यावेळी सरपंच भगवान भिल ग्रामसेवक आर.एल. पाटील, पोलीस पाटील उमाकांत गुर्जर आदी उपस्थित होते. दरम्यान या आजाराने तालुक्यात याआधी दोन गुरे दगावली आहेत तर निम येथील नारायण क्षीरसागर यांचा बैल दगवल्यामुळे पशुधन पाळणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज रोजी या बैल व्यतिरिक्त गावात व परिसरात कुठेही लम्पि रोगाचा प्रादुर्भाव नाही असे पशुवैद्यकीय अधिकारी बी एस पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले.


Protected Content

Play sound