Home Uncategorized मराठा आरक्षण कायदा करा नाहीतर प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जाणार : हर्षवर्धन...

मराठा आरक्षण कायदा करा नाहीतर प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जाणार : हर्षवर्धन जाधव


2Harshwardhan 20Jadhav 20New

औरंगाबाद (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावे ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्या मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवत खैरेंना थेट आव्हान दिले. मला औरंगाबाद लोकसभेत 2 लक्ष 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत. जर मराठा आरक्षण कायदा झाला नाहीतर मराठा समाज वंचित आघाडीसोबत दिसेल, असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडालेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound