Home धर्म-समाज जनता शिक्षण मंडळाच्या ८४ व्या वर्धापन दिन उत्सहात संपन्न

जनता शिक्षण मंडळाच्या ८४ व्या वर्धापन दिन उत्सहात संपन्न

0
32


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जनता शिक्षण मंडळाच्या ८४ व्या  वर्धापन दिनानिमित्त खिरोदा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

आज सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी  जनता शिक्षण मंडळाच्या ८४ व्या  वर्धापन दिनानिमित्त  गंगा भवन खिरोदा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी तसेच कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यांना आमदार शिरीष चौधरी व धनंजय चौधरी यांचे हस्ते हार अर्पण करण्यात आले. तसेच लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक तुकाराम बोरोले यांनी केले.  आमदार शिरीष चौधरी यांनी संस्थेचा इतिहास थोडक्यात सांगितला. आजच्या काळात शिक्षण व्यवस्थेत झालेला बदल लक्षात घेऊन वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला बदल स्वीकारावे लागतील हे जरी खरं असलं तरी पूर्वीच्या या थोर व्यक्तींच्या कार्याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे  असे प्रतिपादन आ. शिरीष चौधरी यांनी केले. संस्थेचे सहसचिव कुमार चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन श्री. मुंडे  तर आभार  भुकन सरांनी मानले. कार्यक्रमास  अजित पाटील, व्ही. आर. पाटील, आर. एल. चौधरी,  संस्थेचे शाखाप्रमुख सातपुडा विकास मंडळ पाल संस्थेचे शाखाप्रमुख व कार्यकर्ते हजर होते.


Protected Content

Play sound