Home क्राईम ब्रेकींग : भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर आढळला मृतदेह; घातपाताचा संशय !

ब्रेकींग : भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर आढळला मृतदेह; घातपाताचा संशय !

0
141


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर ३२ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सोमवारी ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता भादली येथील पोलीस पाटील राधीका ढाके यांनी नशिराबाद पोलीसांनी माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घेतली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात केली आहे. चौकशी अंती सौरभ यशवंत चौधरी (वय-३२) रा. जुने खेडी रोड, दशरथ नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी मयत सौरभ चौधरी यांच्या मोबाईलवरून कुटुंबाशी सपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार आई, बहिण व मामा यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची ओळख पटली. शेवटे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांत नोंद घेण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound