Home Cities रावेर सायमा खानचे एमबीए परिक्षेत यश

सायमा खानचे एमबीए परिक्षेत यश


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सायमा खान अख्तार खान हिने दक्षिण ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतून एमबीए परिक्षेत पहिल्या १५ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे.

याबाबत अधिक असे की, सावदा शहरातील प्रसिद्ध गोल्डन ट्रान्सपोर्टचे संचालक अख्तरखान हाजी हबीबुल्ला खान यांची द्वितीय मुलगी सायमा खान अख्तरखान हिने दक्षिण ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी एमबीए परिक्षेत घवघवीत यश संपादन करून पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. तिच्या यशाबद्दल सावदासह परिसरात अभिनंदन होत आहे. तिने कुलाबा येथे इंजीनियरिंग केले असून त्यानंतर ती दक्षिण ऑस्ट्रेलिया येथे एमबीए शिक्षणासाठी गेली होती. एमबीए परिक्षेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पहिल्या पंधरा मध्ये स्थान मिळाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound