Home Cities जळगाव पिप्राळ्यात उद्या रक्षा विसर्जन मिरवणूक सोहळा

पिप्राळ्यात उद्या रक्षा विसर्जन मिरवणूक सोहळा

0
38


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पिप्राळा जीर्ण (जुना) रथ विसर्जन सोहळ्यानिमित्त होमहवन व विधीव्रत पुजा संपन्न होऊन उद्या रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी रक्षा विसर्जन मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी होमहवन व विधीव्रत पुजेने पिंप्राळा येथील जीर्ण (जुना) रथाचे विसर्जन संपन्न झाले. वाणी समाज बांधव व ग्रामस्थ मंडळीच्या त्यातील रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी रक्षा विसर्जन मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजेपासून मोठ्या थाटात पिंप्राळानगरीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

रथाचा मार्ग-

गांधी चौक ते रथ चौक, कुंभार वाडा, कोळी वाडा, मढी चौक, श्री महाराणा प्रताप चौक, श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परंत गांधी चौकापर्यंत निघणार असून नंतर रक्षा विसर्जनासाठी श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील चांगदेव महराज मंदिराजवळील त्रिवेणी संगमात होईल. यांची सर्वांनी नोंद घ्यावी व मिरवणूक व दर्शन सोहळ्यास अवश्य यावे, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थान अध्यक्ष मोहनदास पुरूषोत्तम वाणी व सर्व कार्यकारणी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound