पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथे माजी आमदार आर.ओ.(तात्या) पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांची सुकन्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी व पाचोरा – भडगाव शिवसेना आयोजित भव्य योगासन व प्राणायाम महाशिबीराची सुरुवात झाली. शिबीराचे पहिल्याच दिवशी शहरातील नागरीक व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
पतंजली योग समिती हरिद्वार येथील स्वामी विप्रदेवजी महाराज व स्वामी यज्ञदेवजी महाराज यांनी योग व प्राणायाम शिबीराचे प्रशिक्षण दिले. पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणात आज दि. १ ऑक्टोबर सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, श्रीमती कमलताई रघुनाथ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, रमेश बाफना, शरद पाटील, पप्पू राजपूत, डॉ. योगेंद्रसिंह मौर्य, तिलोत्तमा मौर्य, कौशल्या लॅबोरेटरीचे संचालक डॉ. गोरख महाजन, डॉ. सुनिल पाटील, दिशा डेंन्टल क्लिनिकचे संचालक डॉ. अमोल जाधव यांचे हस्ते करण्यात आले.
पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. १ ऑक्टोबर ते दि. ५ ऑक्टोबरपर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरास निर्मल सिड्सचे महाव्यवस्थापक एस. एस. पाटील, प्रमोद दळवी, रवी चौरपगार, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंह सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, प्रशासन अधिकारी नंदू पाटील, एम. एस. पाटील, सुधाकर सुस्ते सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.