Home राष्ट्रीय सुरत येथे भीषण आग; १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरत येथे भीषण आग; १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
30

surat fire

सुरत वृत्तसंस्था । सुरत येथील एका इमारतीमध्ये असणार्‍या कोचींग क्लासला भीषण आग लागली असून यात १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, सुरत येथील सरथाना भागातल्या तक्षशीला संकुलात आज सायंकाळी भीषण आग लागली. याच्या वरील मजल्यांना आग लागली असून येथे कोचींग क्लास असल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे लोळ आणि धुरापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वरून उड्या मारल्या. मात्र यात त्यांचा मृत्यू झाला. शेवटचे वृत्त हाती आले तोवर या दुर्घटनेत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound