
एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे सोमवारी उत्साह पूर्ण वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली.

एरंडोल शहरात पाच सार्वजनिक गणेश मंडळातर्फे तर दहा खाजगी मंडळातर्फे दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून दुर्गा देवीची स्थापना केली. विशेष म्हणजे भगवा चौक परिसरात मंडळाच्या कार्यकर्त्यांची व नागरिकांची दुर्गा देवीची मूर्ती व साहित्य खरेदीसाठी मोठे गर्दी झाली होती. दरम्यान, नवरात्रीच्या शुभ मुहूर्त अहवाल नवीन दुचाकी घेण्यासाठी शोरूम वर गर्दी झाली.


