जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोना काळात चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात भाडेतत्त्वावर लावलेल्या रुग्णवाहिकेचे थकीत रक्कम शासनाकडून न मिळाल्याने चाळीसगाव येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला.
धीरज अशोक कोसोदे रा. वृंदावन नगर, चाळीसगाव असे तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडे खासगी रूग्णवाहिका आहेत. त्यावर आपला उदरनिर्वाह करतो. कोरोना काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने धीरज कासोदे याच्या तीन रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर लावल्या होत्या. या तीनही रूग्णवाहनाने दिलेल्या मुदतीत आपली सेवा बजावली होती. या कालावधीत तीनही रुग्णवाहिकेचे एकूण १५ लाख ५१ हजार ४०० रुपये शासनाकडे थकीत आहे, ही थकीत असलेली रक्कम मिळावी. यासाठी धीरजने वारंवार मागणी केली. त्याच्या मागणीची चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयाने कुठलीही दखल घेतली नाही. धीरजने कर्ज काढून रुग्णवाहिका घेतलेल्या आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. तरुणाने केलेल्या मागणीची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीसांच्या सतर्कतेमुळे तातडीने धाव घेत तरुणांच्या हातातील पेट्रोलची बाटली व आगपेटी जप्त केले आहे.