जळगावातून दोन सायकलींची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुना आसोदारोड वरील बजरंग कॉलनीतून दोन सायकलांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात गुरुवार २२ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण सुरेश कोलते (वय-४५) रा. बजरंग कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या दोन सायकली त्यांच्या घरासमोर पार्क करून लावल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या दोन्ही सायकल चोरून नेल्या. हा प्रकार गुरुवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. त्यांनी दोन्ही सायकलींचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दोन्ही सायकली त्यांना मिळून आल्या नाहीत. या संदर्भात त्यांनी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र पाटील करीत आहे.

Protected Content