पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे रस्त्यावर गर्दी असल्याने येथे काय झाले असा प्रश्न विचारला असतांना चार चाकी धारकावर बापाने कुऱ्हाडीने वार केला. तर एका मुलाने डोक्यात काठी मारुन गंभीर जखमी करत दुसऱ्या मुलाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने बापासह दोन मुलाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यात पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे दि. २० रोजी लोटन जयराम कुंभार (वय – ३३) हे सकाळी ११ वाजता आपले चारचाकी वाहन घरी घेऊन जात असतांना रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने त्यांनी त्यांचा साथीदार किरण कुंभार यास काय झाले ? असे विचारले असता समोर उभा असलेला विश्वनाथ जगन्नाथ लोहार यास राग येवून त्याने त्याच्या हातीतील कुऱ्हाडीचा वार लोटन कुंभार याचे डोक्यावर करण्याचा प्रयत्न केला असता विश्वनाथने तो वार उजव्या हातावर झेलला. याच वेळी त्याचा मुलगा पंकज लोहार याने हातातील लाकडी काठी लोटन कुंभार याचे डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले तर लहान मुलगा भावेश याने लोटन कुंभार यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने बापासह दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत. जखमी लोटन कुंभार यांचेवर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.