Home Uncategorized कारण नसतांना एकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

कारण नसतांना एकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

0
55

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भूषण कॉलनीत काहीही कारण नसतांना एका प्रौढ व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी बुधवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश घनश्याम पाटील (वय-५८) रा. गिरणा पंपींग रोड शिवराम नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता कामाच्या निमित्ताने भुषण कॉलनीतून पायी जात असतांना ईश्वर तायडे व नितीन मोरे यांनी काहीही कारण नसतांना त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देवून तोंडाला दुखापत केली आहे. खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर बुधवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात ईश्वर तायडे आणि नितीन मोरे (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.

 


Protected Content

Play sound