Home क्राईम तांबापूरा येथील दत्त मंदीराजवळून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला अटक

तांबापूरा येथील दत्त मंदीराजवळून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला अटक

0
47


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा येथील दत्त मंदीराजवळून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शिवलाल चव्हाण (वय-३८) रा. शेंदुर्णी ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ज्ञानेश्वर चव्हाण हा तांबापूरा परिसरातील दत्त मंदीराजवळ राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १९ सीक्यू १७५) ने आला होता. रात्री नातेवाईकांडे मुक्कामी थांबलेला होता. त्यामुळे ज्ञानेश्वर चव्हाण याने त्याची दुचाकी दत्त मंदीराजवळ रात्री १० वाजता पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली. ज्ञानेश्वर चव्हाण यांने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर महिनाभरानंतर मंगळवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी शंकर विश्वनाथ साबळे रा. गेंदालाल मिल, जळगाव याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound