जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि धम्म चळवळ पुढे नेण्याचे कार्य भैय्यासाहेब आंबेडकरांनी केले असे प्रतिपादन प्रा. राकेश रामटेके (संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलतांना केले. पुढे बोलतांना प्रा.रामटेके म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मानवमुक्तीची, सामाजिक परिवर्तनाची चळवळ यशवंतराव आंबेडकर यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने पुढे नेण्याचे कार्य केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल डोंगरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.उमेश गोगडिया, व्यवस्थापन शास्त्रे प्रशाळेतील प्रा.मधुलिका सोनावणे, प्रा.पवित्रा पाटील, प्रा. रमेश सरदार, प्रा.यशोदीप पाटील, डॉ.प्रशांत सोनवणे, डॉ.अभय मानसरे, डॉ.गोपाळ पाटील, डॉ.समाधान कुंभार, डॉ. मनोज इंगोले, प्राध्यापिका महाले, प्राध्यापिका कविता पाटील, डॉ.अनिल तौर, अक्षय सपकाळे, कुणाल महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक डॉ.विजय घोरपडे यांनी केले तर आभार डॉ.समाधान बनसोडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.