महामार्गावरील रस्त्यांबाबत महापौर दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कालिंका माता चौक ते खोटे नगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबत खा.उन्मेष पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दुरूस्तीबाबत खडसावले होते. या अनुषंगाने महापालिकेतील महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बैठक घेण्यात आली.

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेविका सुचिता हाडा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, सरिता माळी कोल्हे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सिन्हा यांच्यासह आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गावर तयार झाल्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट नागरीकांच्या घरात येत होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी नसणारी सुविधा, पथदिव्यांचा अभाव यासह अनेक समस्या उद्भवल्या होत्या. यासंदर्भात जळगाव शहरातील वाहनधारक व नागरीकांच्या अनेक तक्रारी महापालिकेत प्राप्त झाल्या होत्या. शिवाय यासंदर्भात अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी देखील चर्चा करण्यात आली होती. परंतू याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले होते. ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी त्यांच्या डायमंड व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबतचा मुद्दा मांडला. हा प्रकार खासदार उन्मेश पाटील सांगितला. त्यानंतर खासदार उन्मेश पाटील यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावर जावून पाहणी करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या अनुषंगाने महापालिकेत महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. येत्या सात दिवसात महामार्गावरील काम करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे अधिकारी सिन्हा दिले आहे.

Protected Content