Home क्राईम रागाच्या भरात अल्पवयीन मुलगा बेपत्ता

रागाच्या भरात अल्पवयीन मुलगा बेपत्ता

0
26

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा रागातून त्याच्या घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आहे. मुलगा घरी परत न आल्याने याप्रकरणी बुधवार, ८ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी सकाळी हा मुलगा घरात कुणाला काही एक न सांगता रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला. सर्वत्र शोध घेवूनही मुलगा मिळून आला नाही. हा उशीरापर्यंत घरी परत आला नाही. अखेर या बाबत मुलाचे वडीलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी नशीराबाद पोलिसात तक्रार केली. मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढी तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.


Protected Content

Play sound